NCPI Major Changes in UPI | 1 जानेवारीपासून बंद होणार तुमचा Paytm-GPay UPI आयडी! हे आहे कारण

भारत देशामध्ये नोटबंदीनंतर यूपीआय पेमेंट च्या सर्वात जास्त वापर वाढला त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारी मध्ये सुद्धा वाढ झाली.

UPI payment चा वापर दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु काही लोकांनी यूपीआय सुरुवात करून त्याचा वापर केला नाही अशा लोकांचे यूपीआय बंद होणार आहेत. मागील वर्षभरात यूपीआयचा वापर केला नसेल तर तो एनपीसीआयमार्फत ऑटोमॅटिक बंद होणार आहे.

NPCI ANNOUNCE NEW GUIDELINES FOR UPI PAYMENT in 2024

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) मार्फत मागील वर्षांमध्ये ज्या UPI आयडीवरून एकही व्यवहार झालेला नाही असे यूपीआय आयडी हे बंद होणार आहेत. आरबीआयच्या नवीन गाईडलाईनुसार सर्व बँका Google pay, phone pe, Paytm यासारख्या थर्ड पार्टी apps UPI id बंद करतील.

यूपीआय आयडी वापर करताना त्याच्या रजिस्टर नंबर तसेच रजिस्टर ईमेल आयडी वरती मेसेज द्वारे कळविण्यात येईल की तुमचा संबंधित यूपीआय आयडी हा निष्क्रिय असल्याकारणाने बंद करण्यात येत आहे.

ज्या यूजर ना त्यांचा यूपीआय आयडी त्यांनी तो अपडेट करावा हा या मेसेज मागचा उद्देश असणार आहे.

UPI PAYMENT ID अपडेट करण्यासाठी फक्त वापर करता यांना एक व्यवहार करावा लागणार आहे ज्यामुळे सदरचा यूपीआय आयडी हा ऑटो मॅटिक सुरू राहणार आहे ज्या व्यक्तींनी मागील एका वर्षात एकही व्यवहार यूपीआय पेमेंट मार्फत केला नाही त्यांचा सदरचा यूपी आयडी बंद होणार आहे.

UPI Payment limit पेमेंट लिमिट –

डेली पेमेंट लिमिट जास्तीतजास्त 1 लाख रुपये असेल हा महत्वाचा निर्णय असणार आहे.

त्याचप्रमाणे एक जानेवारी 2024 पासून नवीन युजरला पेमेंट करताना दोन हजाराच्या वर पेमेंट केल्यास त्यासाठी सेटलमेंट टाईम हा चार तास ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे नवीन नियमामुळे व्यापारी वर्ग यांना थोडा त्रास होणार आहे. या सेटलमेंट टाईम ठेवण्याच्या मागचा उद्देश असा आहे की मागील वर्षांमध्ये सायबर क्राईम मध्ये झालेली वाढ आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ट्रान्झ्याक्शन सेटलमेंट टाइम UPI settlement time rule 2024

०१ जानेवारी २०२४ पासून रुपये 2,000/- पेक्षा जास्त रकमेचे सेटलमेंट होण्यास 04 तास लागणार आहेत.RBI ने सायबर गुन्हेगारी Cyber crime रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. आत्ता पर्यंत ट्रान्झ्याक्शन झाले की लगेचच विक्रेत्याच्या अकाऊंट ला पैसे जमा व्हायचे, जानेवारी नंतर तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीस, शॉप ला किंवा ऑनलाईन ₹ 2000 पेक्षा जास्त रक्कम UPI ने पेड केली असेल तर त्या विक्रेत्याच्या अकाऊंट ला ती रक्कम जमा होण्यासाठी 4 तास लागणार आहेत.पण तुम्ही ती व्यक्ति किंवा दुकानदाराला नेहमी (Frequently) UPI द्वारे पेमेंट करत असाल तर हा नियम लागू होत नाही.

UPI CIRCULAR अधिकृत संकेतस्थळ आहे पुढील ठिकाणी पाहू शकता.

error: Content is protected !!
%d bloggers like this: