धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची खरेदी का केली जाते?

दिवाळीच्या एक दिवस आधी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. 

– असे म्हणतात, धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घरात वास्तव्य करते.

अशी मान्यता आहे की या वस्तू खरेदी केल्यास भगवान कुबेर प्रसन्न होतात.

– इतकेच नाही, जर तुम्ही नव्या घरात प्रवेश करत असाल, तर नवी झाडू घेऊनच या घरात गृहप्रवेश करावा. असे करणे शुभ मानले जाते.

– धनत्रयोदशीच्या दिवशी नवी झाडू खरेदी करून त्याची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवसापासून त्याचा वापर सुरू करावा. झाडूचा योग्य उपयोग केल्यास जीवनातील अनेक समस्यांपासून आपली सुटका होऊ शकते असे म्हणतात.

अशीही मान्यता आहे की झाडूचा अपमान करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अपमान करणे. म्हणूनच कधीही झाडूला पाय लावू नये असे आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला अनेकदा सांगितले असेल

माहिती आवडल्यास पुढे पाठवा आणि आपली संस्कृति जपासण्यास मदत करा

धन्यवाद..