Talathi Bharti  १००० पदांसाठी तलाठी भरती

शैक्षणिक पात्रता Talathi Bharti

– 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा – 2) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (MS-CIT, Ccc इ.) – 3) आवश्यक मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

मुंबई, दि. 17 : Talathi Bharti 2022 महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आज दिले.

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

येत्या काही दिवसात 1000 पदांची भरती होणार आहे यासाठी सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. तलाठी भरती ची अधिसूचना आल्यावर तलाठी भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून करायचे आहेत. व कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली जाईल Talathi Bharti GR.