चोरी गेलेला किंवा हरवलेला स्मार्टफोन कसा ब्लॉक करायचा?

CEIR पोर्टल च्या अधिकृत सांकेतिक स्थळावर जाऊन आपण  आपला हरवलेला किंवा चोरी  गेलेला स्मार्ट मोबाइल फोन हा  ब्लॉक करू शकतो.

पुढील  कागदपत्रे तयार  ठेवावी कारण सदरच्या पोर्टलवर आवेदन अर्ज सादर करताना आपल्याला त्याची आवश्यकता भासणार आहे.

आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड यापैकी एक ओळख पत्र

मोबाईलची खरेदी पावती (lost mobile invoice/bill)

– पोलीस ठाणे मध्ये दिलेल्या तक्रारीची प्रत उदाहरणार्थ एफ आय आर ची कॉपी किंवा मोबाईल हरवले बाबतची तक्रार

– तक्रारदाराचा स्मार्टफोन हरवला त्यामधील सिम कार्ड पुन्हा प्रस्थापित करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच हरवलेल्या सिम कार्ड पुन्हा चालू करणे आवश्यक आहे कारण की त्यावर आपल्याला नंतर ओटीपी मिळणार आहे.

CEIR पोर्टल सांकेतिकस्थळाला येथे भेट द्या

तीन ऑप्शन दिसतील ती पुढील प्रमाणे:

1. ब्लॉक स्टोलन / हरवलेला मोबाईल 2. रिक्वेस्ट स्टेटस 3. अनब्लॉक फाउंड मोबाइल

यापैकी क्रमांक 1) ब्लॉक स्टोलन / हरवलेला मोबाईल या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्यासमोर पुढील प्रमाणे एक आपलिकेशन फॉर्म असलेले नवीन पेज ओपन होईल तो भरा आणि सबमिट करा.