एखाद्या कर्मचाऱ्यांनी नोकरी करत असताना कर्मचाऱ्यांनी आपली पदोन्नती पात्रता असताना पदोन्नती नाकारल्यास काय परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती शासनाच्या शासन निर्णय जीआर प्रमाणे दिलेली आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय
महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग दिनांक 12.09.2016 रोजी शासन निर्णय संकेतांक 201609121629099907 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याची पदोन्नती नाकारल्यास होणारे परिणाम पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील.
- जर एखाद्या राज्य शासन कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी आपली पदोन्नती नाकारल्यास किंवा कर्मचारी पात्र असताना पदोन्नती नाकारल्यास ्या कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकार्याचा पुढील कोणत्याही प्रकारच्या पदोन्नती निवड साठी विचार केला जाणार नाही.
- तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांनी त्याची वरच्या संवर्गात निवड झाल्यानंतर तसेच किंवा वरच्या संवर्गात निवड होण्यापूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांनी पदोन्नती घेण्यास नकार दिला असेल तर त्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती यादी मधून पुढील दोन वर्षासाठी नाव कमी करण्यात येईल. त्यानंतर परत पदोन्नती करता त्याला तिसऱ्या वर्षी त्या कर्मचाऱ्यांची पद्धत साठी पात्रता तपासण्यात येईल.
- तसेच ज्या अधिकारी किंवा कर्मचारी यांनी पहिल्या पदोन्नतीस नकार दिला त्यानंतर तीन वर्षानंतर होणाऱ्या पदोन्नती पात्र होऊन सुद्धा नकार दिला. आता त्याचा दोन वर्षे परत पदोन्नती निवड सूची यादी मध्ये विचार करण्यात येणार नाही. अशा प्रकारची ही प्रक्रिया सुरूच राहील.
- त्याचप्रमाणे वरिष्ठ पदाकरता निवड झाल्यानंतर सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांनी पदोन्नती पद न स्वीकारल्यास ज्यावेळी पद्धतीचे पद धारण करतील त्याचवेळी त्यांना वरिष्ठ पदाची सेवा जेष्ठता यादी मध्ये विचार करण्यात येईल.
- आता सदरच्या उमेदवारांनी पदोन्नती घेण्यास नकार दिल्यामुळे जी जागा रिक्त राहते त्या जागेवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवर्गानिहाय ज्येष्ठतेनुसार पात्र असणाऱ्या कनिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांची निवड या ठिकाणी करण्यात येईल.
- ज्या कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारली त्या कर्मचारी अधिकाऱ्यास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला गेला असल्यास संबंधित वित्त विभागाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
तर अशाप्रकारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली पात्रता असलेली पदोन्नती नाकारल्यास वरील परिणाम हे दिसून येतील सदरचे परिणाम हे महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेले आहेत. सदरचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा आणि डाऊनलोड करा.
आपणास सदरची माहिती आवडली असल्यास आणि अशाच प्रकारच्या शासन निर्णय आणि शासन परिपत्रके जाणून घेण्यासाठी आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.