श्री विठ्ठल क्षेत्र पंढरपूर ईतिहास आणि रोचक कथा | किती टक्के वारकरी यांना माहिती किती आहे?
रामकृष्ण हरी माऊली ..🙏 आज आपण या पोस्ट मध्ये श्री विठ्ठल पंढरपूर यांच्या पायावर असलेल्या खड्या बाबत एक रोचक काथा-ईतिहास पाहणार आहोत की जो बहुतांशी वारकरी समुदाय यांना तसेच नवीन पिढीला माहीत नसेल. माऊली चला तर कथा सुरू करू ..
रामकृष्ण हरी 🙏 भगवान श्री विठ्ठलाच्या अंगावर असलेल्या शृंगार व इतर चिन्ह-खूना ह्या प्रतेक बाबीला एक ईतिहास आहे. या लेखात आज आपण “विठ्ठलाच्या चरणावर असलेला खड्डा” या बाबत माहिती पाहणार आहोत. ह्या बाबत वेगवेगळ्या कथा आपण एकल्या असतील माऊली,ही माहिती आज माझ्या वारकरी संप्रदयला माहिती असणे गरजेचे आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा समोर चिरकाल सुरू ठेवणारे आपले संत आज फार थोड्या प्रमाणात सेवा देत आहेत. तरी या ठिकाणी यांचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
माऊली भगवान श्री विठ्ठलाच्या चरणावर दोन बोटे ही रुतलेले आहेत त्या बाबत बऱ्याच लोकांचे वेगवेगळे मत-मतांतरे आहेत. या पोस्ट मध्ये आपणास विशेष माहिती मिळेल की, विठ्ठलाच्या चरणावरती बोटे आहेत ती कोणाची आहेत?
Untold facts of Lord vitthala | Who is Muktikeshi? ;-
तर एक “मुक्तीकेशी” नावाची एक दासी सुंदर अशी एक “स्त्री” होती, ही “मुक्तीकेशी” नावाची दासी पंढरपुराच्या आसपासच्या गावामध्ये राहत होती. दरवर्षीप्रमाणे आषाढी वारी सुरू होते तेव्हा वारकरी हे वारीला जाणे सुरू असते. तर पंढरपूरच्या वारीला जाणारा वारकरी हा विठ्ठलाच्या नाम-घोषात-गजरामध्ये आणि विठ्ठलाच्या स्तुती करण्यामध्ये गुंग होत जात असतो. तेव्हा या “मुक्तीकेशी” नावाच्या दासीला वाटले की एवढासारा हा गोळखा, मानवांचा सागर कुठे जात आहे?. असं काय विशेष आहे की हा जनसमुदाय नाम घोष करत जात आहे. आणि ही लोक कोठे जात आहेत? असे विविध प्रकारचे प्रश्न त्या दासीच्या मनामध्ये येतहोते.
तर या “मुक्तीकेशी” दासीला तिच्या सौंदर्याचा-तारुण्याचा-कोमलतेचा खूप अभिमान होता. तेव्हा तिने काही वारकऱ्यांना अडवले आणि विचारले की तुम्ही नेमके कुठे जात आहात? एवढ्या आतुरतेने एवढ्या आनंदामध्ये आपण सर्व लोक कुठे जात आहात? तेव्हा त्यातील वारकरी यांनी सांगितले की आम्ही आमच्या पंढरीच्या राजाला भेटायला चाललो आहे.
“मुक्तीकेशी” ला विचार येत होता की, हा पंढरीचा राजा कोण आहे? तो कसा दिसतो? त्यावेळी त्या वारकऱ्यांनी असे वर्णन केले की, आमचा हा पंढरीचा राजा “गोकुळामध्ये असताना खूप असं लोणी खायचा व आमच्या राजाला लोणी खायला खूप आवडत असे, आणि आमचा राजा हा लोण्यासारखाच नरम सुद्धा आहे”.
“आमच्या राजाचं रूप एवढा सुंदर आहे की कोणीही त्यांच्या रूपावर भाळून जाईल”. त्यावेळी त्या “मुक्तिकेशीला” इच्छा झाली की आपणही त्या पंढरीच्या राजाला भेटले पाहिजे.
पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 | Pandharpur live |
श्री विठ्ठल रुख्मिणी दर्शन पहा मोबाईलवर थेट मोबाईल वर 🙏पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन (Live Darshan Pandharpur) 🚩
“मुक्तीकेशी” ला वाटले की, आपणही या पंढरीच्या राजाला भेटले पाहिजे असा कोण आहे की ज्यांच्याकडे हे लोक नाम घोष करत जय जय कार करत जात आहेत. आणि “मुक्तीकेशी” तिच्या सौंदर्यावर एवढा अभिमान होता की तिला वाटलं आपण या राजाला भेटलेच पाहिजे.
आणि ही “मुक्तीकेशी” नावाची दाशी या वारकरी लोकांसोबत पंढरपूरला आली तिच्या हृदयामध्ये शुद्ध भाव निर्माण झाला, श्रद्धा निर्माण झाली आणि तिला विठ्ठल भेटीची आस ओढ लागली होती. ज्याप्रमाणे वारकरी यांनी तिला वर्णन सांगितलं होतं त्यानुसार ती देवाचे नामस्मरण करायला लागली, सदैव देवाचे स्मरण करायला लागली. आणि देवाच्या नामस्मरणाने तिची शुद्धता झाली व तिचे हृदय शुद्ध झाले.
पंढरपुरामध्ये आल्यानंतर तिला भगवान श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली. आणि आता पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तिला दिसले की, “हीतर एक पाषाणाची काळी-सावळी अशी मूर्ती आहे”.
“हीतर एक पाषाणाची मूर्ती दिसत आहे तिच्यामध्ये काय असे विशेष आहे”, हे वारकरी तर सांगत होते की, “आमचा राजा हा लोण्यासारखा नरम आहे. ही मूर्ती कसली लोण्यासारखी नरम असणार आहे ही तर पाषाणाची आहे”.
म्हणून “तिने परीक्षा घेण्यासाठी आपले दोन बोटं भगवान श्री विठ्ठलाच्या चरणाला लावली“. आणि “माऊली लावता क्षणी ते दोन बोटं भगवान श्री विठ्ठलाच्या चरणामध्ये रुतल्या गेली” आणि त्यावेळी त्या मुक्ती केशी दाशीला कळाले आणि ती भावुक होऊन रडू लागली तिला आपल्या विचारांचा पश्चाताप होत होता. तिने भगवंतासमोर माफी मागितली आणि भगवान श्री विठ्ठलाला आपल्या झालेल्या चुकीबद्दल क्षमा करण्याची विनवणी विनंती केली.
History of lord vitthala | What is the history of Lord Vitthal:
तर माऊली अशाप्रकारे ही एक कथा आहे की एका “मुक्तीकेशी” नावाच्या दाशीची ती दोन बोटे विठ्ठल चरणी रुतल्यामुळे ते दोन खड्डे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत.
तर माऊली अशाप्रकारे भगवान “श्री विठ्ठलाच्या पायावर निर्माण झालेले दोन खड्डे याबाबत ही पौराणिक कथा आहे” जी की आपल्या वारकरी संप्रदायातील बहुतांश वारकरी मंडळीला कदाचित माहीत नसा नसेल. आणि नवीन पिढीला सुद्धा या इतिहासाची माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न या सुंदर लेखा मधून आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. जर आपणास ही कथा आणि इतिहास आवडला असेल तर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.
वारकरी संप्रदायाचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे त्याबद्दल भगवान श्री विठ्ठलाची आम्ही चरणी नतमस्तक आहोत. भगवंताचे असेच रोचक कथा आपल्याला या ठिकाणी मिळतील तेव्हा या सांकेतिक स्थळाला भेट देत राहा रामकृष्ण हरी माऊली!
Story of Lord Vitthal at Pandharpur – Story of Panduranga Vittala:
Ramakrishna Hari, Today, we are going to look at the information about the “pit at the feet of Lord Vitthal”. You may have heard different stories about this, Mauli, this information needs to be known to my Warkari sect today. Today, our saints, who have continued the tradition of the Warakari sect forever, are rendering very little service. However, this is our small effort in this place.
Many people have different opinions about the fact that two fingers are at the feet of Sri Vitthal. In this post you will find special information, Whose fingers are on the feet of Vitthal?
So there was a beautiful “woman” named “Muktikeshi”, a maid named “Muktikeshi” was living in a village around Pandharpur. Warkari starts going to Wari when Ashadhi Wari starts like every year. On the other hand, a Warkari going to Pandharpur’s Wari is getting dumbfounded in chanting the name of Vitthal and praising Vitthal. So this maid named “Muktikeshi” thought that where is this Groups, the ocean of human beings going ?. What is special is that this crowd is chanting Naam. And where are these people going? Such a variety of questions were coming to the mind of that language.
So this “liberated” maid was very proud of her beauty-youth-tenderness. Then she stopped some Warakaris and asked where exactly are you going? Where are you all going with so much joy in such a hurry? Then Warakari said that we are going to meet our Pandhari king.
“Muktikeshi” was thinking, who is this king of Pandhari? What does he look like At that time, the Warakaris described that our Pandhari king “used to eat a lot of butter when he was in Gokul and our king loved to eat butter, and our king is as soft as butter”. “Our king’s form is so beautiful that no one will fall in love with his form.” At that time, the “liberator” wished that we should also meet the king of Pandhari.
“Muktikeshi” thought that we should also meet this Pandhari king who has these people chanting Jai Jai Kar. And “Muktishi” was so proud of her beauty that she thought we should meet this king. And this Dashi named “Muktikeshi” came to Pandharpur with the people of Warakari. As Warkari had described to her, she started chanting the name of God, always remembering God. And the remembrance of God’s name made her pure and her heart pure.
After coming to Pandharpur, she got an opportunity to pay obeisance to Lord Vitthal. And now after going to Pandharpur, she saw that “Heather is a black-shadow idol of a stone”.
“What is so special about a stone idol is that it looks so hot,” said the Warakari, “our king is as soft as butter. This idol is going to be as soft as butter.
So “she put her two fingers at the feet of Lord Sri Vitthal to take the test”. And “At the moment of Mauli Lavata, those two fingers got entangled in the footsteps of Lord Sri Vitthal” and at that moment, Keshi Dashi realized that liberation and she started crying emotionally, she was regretting her thoughts. She apologized to the Lord and begged Lord Vitthal to forgive her for her mistake.
So Mauli is a story in such a way that the two pits of a Dashi named “Muktikeshi” are at the feet of Vitthal and the two pits are formed in that place.