ग्रामपंचायत निवडणूक 2022-23 : मित्रांनो सर्वप्रथम Mahanews या सांकेतिक स्थळावर आपले स्वागत आहे. आज आपण एक नवीन माहिती तुम्हाला करून देणार आहोत ती म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराची संपूर्ण तपशील कसा पाहता येईल. तर या ठिकाणी आजआपण तुमच्या मोबाइल वरून तुमच्या गावातील ग्रामपंचायत उमेदवाराचे माहिती ऑनलाईन कशी पाहू शकता याबाबत माहिती घेणार आहोत.
शासनाच्या लेटेस्ट शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत सरपंच हा थेट जणतेमधून निवडण्यात येणार आहे त्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच निवडणूक तयारी असल्याचे दिसून येत आहे. तर मग ग्रामपंचायत निवडणूक असते तेव्हा आपल्याला जो उमेदवार निवडून द्यावयाचा आहे त्या उमेदवाराची संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ:
- ग्रामपंचायत उमेदवार यांच्यावर एखादा गुन्हा दाखल आहे का?
- ग्रामपंचायत उमेदवार यांचे उत्पन्न किती आहे?
- ग्रामपंचायत उमेदवार यांचेजवळ संपत्ति किती आहे.
तेव्हा वरील माहिती घेऊनच आपण आपल्या उमेदवाराची निवड करावी जेणेकरून तुमचे मतदान व्यर्थ जाणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराची संपूर्ण तपशील कसा पाहायचा? |How to Find Grampanchayt Candidates Infoemation
मित्रांनो सर्वप्रथम आपणास राज्य निवडणूक आयोगाच्या State Election Commission या वेबसाईट ला भेट द्यावी. सदर निवडूक आयोगाची लिंक ही आपणास समोर दिली आहे त्यावर क्लिक करून आपण निवडणूक आयोगाच्या सांकेतिकस्थळवर पोहचाल त्यानंतर समोर दिलेल्या कृती स्टेप बाय स्टेप करा.
Find Grampanchayat Candidates Details Step By Step |ग्रामपंचायत उमेदवार तपशील पहा
आपण निवडणूक आयोगाच्या सांकेतिकस्थळवर आल्यानंतर आपणास वरील प्रमाणे मुखपेज दिसेल. त्या पेजवर तुम्हाला Affidivate the final contesting candidates या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल. त्या नंतर तुमच्या समोर पुढील नवीन पेज ओपेन होईल.
आता या पेज वरती तुम्हाला पुढील कृती करावयाच्या आहेत. ग्रामपंचायत उमेदवार यांची माहिती पाहण्यासाठी पुढील स्टेप बाय स्टेप पर्याय निवडा.
- प्रथम लोकल बॉडी (Local Body) या ऑप्शन मध्ये ग्रामपंचायत निवडा.
- आता त्याखाली Devision यावर आपला विभाग निवडा.
- त्यासंमोरील ऑप्शन वर आपला जिल्हा निवडा
- आता तालुका निवडा
- आता आपले गाव निवडा
- इलेक्शन प्रोग्राम मध्ये निवडणूक कार्यक्रम निवडा
- शेवटी आपला वॉर्ड निवडा
- आणि सर्च या वर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक लिस्ट येईल.
Read Also: Maharashtra IAS Transfers 2022 | राज्यातील 44 IAS अधिकारी खांदेपालट, शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
आता आपल्या समोर आपल्या वॉर्ड मधील उमेदवाराची यादी समोर दिसेल त्यांच्यानावसमोर जर NA असेल दिसत असेल तर त्याचा अर्ज रद्द झाला असे समजावे.
- ज्या उमेदवार नावसमोर Affidivate View दिसेल त्या वर क्लिक कर आणि संबंधित ग्रामपंचायत उमेदवार याचे संपूर्ण तपशील तुमच्या मोबाइल वर असेल. ग्रामपंचायत उमेदवार यांची मालमत्ता त्याच्यावर असलेले गुन्हे संपूर्ण तपशील तुमच्या हातात असेल.
find grampanchayt candidates details information for election 2023-24
आपल्या गावाचा विकास आपल्याला करायचा असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये काम करणारे उमेदवार हे उत्तम दर्जाचे निवडून द्यायला हवे. जोपर्यंत आपण उत्कृष्ट कामगिरी करणारे इमानदारीने कामकाज पाहणारे तसेच कोणत्याही प्रकारचा अंगावर गुन्हा नसलेले किंवा कोणत्याही प्रकारचे बुडीत व्यवहार असलेले असे निरंक आणि होतकरू समाजासाठी झटणारे व्यक्तीच आपण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून दिले पाहिजे. “देशाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम स्वतःपासून सुरुवात करायला हवी” असे आपण ऐकले असेल. त्यामुळे देशाचा विकास हा आपल्या घरापासून- आपल्या वार्डापासून – आपल्या गावापासून – आपल्या जिल्ह्यापासून – आपल्या राज्यापासून आपल्या देशापर्यंत पोहोचतो. अशा प्रकारची साखळी तुटायला नाही पाहिजे, त्यासाठी चांगल्या दर्जाचे समाज कार्य करणारे व्यक्तीस आपण निवडून दिले पाहिजे. जर आपणास आमचे हे विचार आवडत असतील तर समोर पाठवायला विसरू नका. आपला एक शेअर लोकांच्या मनात असलेली परंपरागत मतदानाचीपद्धत बदलून एक श्रेष्ठ इमानदार नागरिक हा ग्रामपंचायतीचा उमेदवार बनवेल. ग्रामपंचायतचा उमेदवार हा इमानदार असावा त्यासाठी त्याची वैयक्तिक माहिती या पोस्टमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता.
मित्रांनो सदारची आपणास आवडली असेल तर आपल्या मोबाइल मधील व्हाटसप्प वर शेअर करा आणि सर्वाना माहिती कळू द्या. धन्यवाद …..!