Aadhar-Voter ID Linking : आधार कार्ड आपल्या मतदान कार्डाबरोबर असे लिंक करा
भारत सरकार निवडणूक आयोग मार्फत इलेक्ट्रॉरर्स फोटो आयडेंटीटी कार्ड (EPIC) ही मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत भारत देशातील सर्व नागरिक यांचे मतदान कार्ड हे आधार कार्ड ची लिंक करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. (EPIC SCHEME by Indian Government to link Voter ID with Adhar Card) EPIC नुसार संपूर्ण भारत देशातील मतदान धारक यांचे मतदान कार्ड हे आधार कार्ड बरोबर लिंक केले जाणार आहे आणि सदरची मोहीम दि.०१ ऑगस्ट २०२२ पासून – दि.३१ मार्च २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. भारत देशातील बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी या मोहिमेचे सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्याला यशस्वी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे काम आहे.
मतदान कार्ड आधार कार्ड से लिंक करण्याचे एकूण 04 पद्धती आहे त्या पुढील प्रमाणे
- राष्ट्रीय मतदाता पोर्टल द्वारे (NVSP Portal)
- SMS च्या मार्फत
- निवडणूक आयोगाच्या मोबाईल आपलिकेशन द्वारे
- मतदान अधिकारी कार्यालयाद्वारे
तर या 04 पद्धती ने भारतीय नागरिक हा आपले मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकतो.
आता आपण एक एक करून वरील चारही पद्धतीचा वापर करता कसा करू शकता हे पाहूया.
1) Voter Helpline App द्वारे निवडणूक ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक
आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे खालील प्रक्रिया FOLLOW करा.
1. सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये voter helpline हे app डाऊनलोड करा
2. त्यानंतर आपलिकेशन ओपन केल्यानंतर voter registration ला क्लिक करा
3. आता तुम्हाला फॉर्म 6 b ला क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर Lets start ला क्लिक करा
5. आता तुम्हाला आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
6. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती otp येईल तो टाका
7. तुम्ही otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा.
8. तुमच्याजवळ voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा
9. तुमचा मतदान कार्ड वरील voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा
10. आता तुम्हाला proceed या बटन वरती क्लिक करावे लागेल.
11. आता तुम्हाला तुमचा आधार नंबर Aadhaar card नंबर टाकावा लागेल.
12. आणि शेवटी Done करा व confirm ला क्लिक करा.
वरील सर्व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप केल्यानंतर आता तुम्हाला तुमचे वोटर आयडी म्हणजेच मतदान कार्ड हे तुमच्या आधार कार्ड जोडला बाबतचा एक मेसेज येईल. म्हणजे तुमचे मतदान कार्ड हे आधार कार्ड ची लिंक झालेले आहे असे समजावे. बोगस मतदानाला घालण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपले मतदान कार्ड आहे आधार कार्डशी लिंक करून घ्यावे आणि दुसऱ्याला सुद्धा सांगावे.
2) link Election Card with Aadhar card by SMS Service एसएमएस द्वारे आपले मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक
एसएमएसच्या मार्फत इलेक्शन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून समोरील क्रमांकावर दिलेल्या फॉरमॅट नुसार एक मेसेज करावा लागेल. मोबाईलच्या एसएमएस सर्विस मध्ये जाऊन 51969 किंवा 166 या क्रमांकावर ECILINK‹SPACE›मतदान कार्ड क्रमांक‹SPACE›आधार क्रमांक असा SMS आपल्या मोबाईल क्रमांकावरून पाठवा.
समजा तुमचे मतदान ओळखपत्र Election Card क्रमांक XL987654321 असेल आणि आधार कार्ड क्रमांक 012345678910 असेल तर तुम्हाला ECILINK XL987654321 012345678910 या नमुन्यात SMS पाठवावा लागेल.
- Read Also: Maharashtra IAS Transfers 2022 | राज्यातील 44 IAS अधिकारी खांदेपालट, शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
3) ऑनलाईन राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल मार्फत (link Election Card with Aadhar card by NVSP Portal)
सर्वप्रथम तुम्हाला गुगल वर जाऊन ‘राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल’ (National Voters Service Portal) सर्च करावी लागेल. आणि तुमच्यासमोर अधिकृत राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल लिंक दिसेल त्यावर क्लिक करून ती ओपन करून घ्यावी. किंवा ‘राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल‘ 👈 येथे क्लीक करून तुम्ही डायरेक्ट पोर्टल जाऊ शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टल वर नोंदणी करावी लागेल त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आधार लिंकिंग या ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर लेट स्टार्ट let’s Start यावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला “NO, I don’t have Voter ID number” व “YES, I have Voter ID number” असे दोन पर्याय येतील. तेव्हा तुमच्याजवळ मतदान कार्ड नंबर असेल Yes करा आणि नसेल तर No करा.
- मतदान ओळखपत्र क्रमांक असेल तर Yes करा आणि Fetch details वर क्लीक करा.
- आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यामुळे तुमचे नाव, वडिलांचे नाव, तुझ्या आडनाव,तुमचा पत्ता, तुमची जन्मतारीख, तुमचे लिंग, तुमचा जिल्हा,तालुका,राज्य याबाबत माहिती भरा
- त्यानंतर आपला मतदारसंघ (Constituency) निवडा तुम्हाला माहित नसेल तर ऑप्शन मध्ये दिलेल्या नकाशावर (Mark on Maps) आपला मतदारसंघ चिन्हित करा व Search🔍 वर क्लीक करा
- आता समोरील List मधून आपले नाव शोधून समोरील View Details वर क्लीक करा
- आता भरलेली माहिती तपासून This is my Electoral name ➡ या ऑप्शन वर क्लीक करा.
- आता तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू (Save & Continue) क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर तुम्हाला एक ओटीपी येईल तो त्या ठिकाणी समाविष्ट करावा लागेल.
- आता तुम्हाला तुमच्याजवळ आधार कार्ड आहे किंवा नाही असे विचारणा होईल. त्या ठिकाणी Yes I have Adhar Card या ऑप्शन वरती क्लिक करा आणि आपला आधार नंबर टाकून सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला डॉक्युमेंट ग्रुप मागतील (Other document Proof Type) तुमच्याजवळ असलेला कागदपत्र पुरावा अटॅच करा.
- आता दिनांक आणि ठिकाण टाकून सेव अँड कंटिन्यू या ऑप्शन वर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचे मतदान ओळखपत्र हे आधार कार्ड सोबत लिंक झाल्याबाबतचा एक रेफरन्स नंबर दिला जाईल.
- अशाप्रकारे तुम्ही “राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल” (NVSP Portal) वर जाऊन आपले इलेक्शन कार्ड आधार कार्ड सिलिंग करू शकता.
4) BLO बूथ लेव्हल ऑफिसर मतदान अधिकारी कार्यालयाद्वारे
तुम्हाला तुमच्या विभागानुसार मतदान अधिकारी कार्यालय शोधावे लागेल आणि त्या कारल्यात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्हाला तुमचे इलेक्शन कार्ड हे आधार कार्ड से लिंक करता येईल. किंवा तुम्ही नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा लिंक करू शकता.
आता तुमचे आधार कार्ड हे इलेक्शन कार्ड सोबत जोडले गेले का नाही हे तपासण्यासाठी खालील लिंक मधून तुम्ही पाहू शकता ‘राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल’ 👉Track Application Status👈 या लिंक वर जाऊन तुम्ही आपला रेफरन्स नंबर टाकून आपली सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.
Link your Voter Card with Aadhar Number FAQ
Q.1) How can I link my Aadhar card with the EPIC number?
Ans:- Just call 1950 from your registered mobile number within 10-5 PM from Monday to Friday. Thereafter, provide your Aadhaar number and EPIC number to the customer care executive.
Q.2) How can I link my Aadhar card with my voter ID?
Ans:- you can link your Aadhar card with your voter ID by https://www.nvsp.in/ portal.